महाराष्ट्र 24 : पिंपरी-चिंचवडः निगडी येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेले बांधकाम हे बेकायदेशीर असून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार दिशांना जागा सोडलेली नाही. दुसऱ्याच व्यक्तीच्या जागेमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून बांधकाम सुरू केले आहे. त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग अधिकारी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सारीका काळभोर-चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना ईमेलद्वारे निवेदन दिले आहे.
विशेष बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी डीपी रोड असून, त्यासाठी जागा सोडण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करत नाही. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बीट मार्शल ह्यांच्या विरोधात खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.