निवेदन द्यायला काय पाकिस्तानातून आलोय का… सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा संतप्त सवाल
पिंपरी । पिंपरी । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून सोमवारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्र्यांना निगडी येथील नागरी समस्या निवारण्यासाठीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पालकमंत्र्यांना निवेदन देण्यास मज्जाव करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना पोलिसांकडून अरेरावी, तसेच दमदाटी करण्यात आली. अखेर पालकमंत्र्यांची भेटच होऊ न दिल्याने काळभोर यांनी तीव्र नाराजी व निषेध व्यक्त केला. अखेर निगडी व्यापारी संघटनाेला भूखंड देण्यात यावा या मागणीचे निवेदन विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांना देण्यात आले.
निगडी येथील रस्ता रुंदीकरणासाठी २००३ साली रस्ता रुंदीकरणमध्ये जमीन संपादित करण्यात आली होती. त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी ठराव मंजूर करून निगडी व्यापारी संघटनांना पेठ क्रमांक २४ भूखंड क्रमांक ८/९ ठराव मंजूर करून देण्यात आला होता त्या संदर्भात दिनांक १५/२/२००६ दहा लाख रुपये रक्कम पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या ठिकाणी जमा करण्यात आली असून, निगडी व्यापारी संघटनेला भूखंड देण्यात यावा म्हणून मागणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मदनलाल धिंग्रा मैदानावर निवेदन देण्यात येणार होते निगडी पोलिस बळाचा वापर करून भूमिपुत्रांना विनाकारण त्रास देत आहे लोकशाही मार्गाने नागरी समस्या निराकरण करण्यासाठी निवेदन देणे कायद्याने गुन्हा आहे का. आम्ही काय पाकिस्तानमधून निवेदन घेऊन आलोय का, असा संतापजन सवाल यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.
निवेदन देणे गुन्हा नाही पोलिस सुरक्षा कारणास्तव कार्यकर्त्यांना विनाकारण वैठीस धरत आहेत. नागरी समस्या निराकरण करण्यासाठी निवेदन देणे कायद्याने बंदी घालण्यात आली नसून फक्त दबावतंत्र वापर सुरू आहे??? असा रोष पोलिस प्रशासनाविरोधात काळभोर यांनी व्यक्त केला आहे.