महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । पुढचे तीन दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी (2 मे) संपूर्ण देशात मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसांत कमाल तापमानाबाबत दिलासादायक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 5 मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (Weather Update imd rain alert states including maharashtra)
हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, ओडिशा, झारखंड, बिहार, कर्नाटक तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, पंजाब, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात हलका पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
तर तेलंगणा, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि तामिळनाडूच्या दूरच्या भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली आहे.
Himachal Pradesh | Heavy rain lashes Shimla, IMD issues orange alert for three days. (01.05) pic.twitter.com/KQlJiEhl8V
— ANI (@ANI) May 1, 2023
बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता, ज्याचे नाव मोचा असू शकेल. असे सांगण्यात आलं आहे. . हे चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 मे ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनं शनिवारी रात्री या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला होता.
काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात असणाऱ्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची माहिती आयएमडीच्या वतीनं देण्यात आली आहे.