महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । विराट कोहली आणि गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज स्टार आहेत, पण त्यांच्यातील भांडणाच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांत भिडले. आयपीएल 2023 मध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने एकना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकात 9 गडी गमावून 126 धावा केल्या. लखनौचा संघ लक्ष्य गाठू शकला नाही आणि 108 धावांत गारद झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हस्तांदोलन करत होते.
कोहली लखनौच्या इतर खेळाडूंशीही हस्तांदोलन करत होता. कोहली आणि गंभीरने हस्तांदोलन केले आणि यावेळी गंभीर रागात दिसला. पंचांशी हस्तांदोलन केल्यानंतर तो रागात काहीतरी बोलला.
यानंतर कोहलीने नवीन-उल-हकशी हस्तांदोलन केले आणि काहीतरी म्हणत पुढे गेला. नवीनने परत उत्तर दिले. कोहलीनेही उत्तर दिले आणि नवीन कोहलीच्या दिशेने वळला. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने नवीनला वेगळे केले आणि कोहली पुढे गेला.
Too much Controversy #ViratKohli #gautamgambhir #RCBVSLSG #naveenulhaq #IPL2023 pic.twitter.com/bWiGYoTvnd
— Markanday Shukla (@im_markanday) May 1, 2023
मेयर्स पुन्हा कोहलीजवळ आला आणि काहीतरी बोलू लागला, पण त्यानंतर गंभीरने येऊन मेयर्सला ओढून नेले. त्यानंतर कोहली पुढे गेला आणि डुप्लेसीशी बोलू लागला. यादरम्यान तो गंभीरशी दुरून बोलत होता आणि काही हातवारे करत होता. त्याच्या बोलण्याला गंभीरही उत्तर देत होता. यावेळी गंभीर खूप संतापलेला दिसत होता. केएल राहुलने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
पण कोहली गंभीर त्याच्याकडे गेला. या दोघांमध्ये पुन्हा चर्चा झाली आणि यादरम्यान दोन्ही संघांचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूही तिथे उपस्थित होते. केएल राहुल, विजय दहिया, डुप्लेसी, मॅक्सवेल यांनी लखनौच्या सपोर्ट स्टाफने दोघांना वेगळे केले आणि प्रकरण शांत केले.