IRCTC ने आणले भन्नाट टूर पॅकेज! उन्हाळ्यात शिमला-कुल्लू-मनाली फिरण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ मे । IRCTC Shimla Kullu Manali Tour Package: तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हिमाचल प्रदेशामध्ये फिरण्याचा प्लॅन करत आहात का, मग तुमच्यासाठी IRCTCने चांगले टुर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजतंर्गत तुम्ही शिमला, मनाली आणि कुल्लू या ठिकाणी फिरू शकता. हे टूर पॅकेज ९ दिवसांचे असणार आहे. या टूर पॅकेजतंर्गत आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना हिमाचल प्रदेशामधील थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. विशेष म्हणजे आयआरसीटीसी पर्यटनाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या टूर पॅकेजतंर्गत सादर करत आहे. या टूर पॅकेजतंर्गत प्रवासी स्वस्तामध्ये देश आणि विदेशात प्रवास करण्याची संधी देऊ शकतात.

१३ मेला सुरू होतेय टूर पॅकेज
IRCTCमध्ये शिमला, कुल्लू आणि मनाली टूर पॅकेज १३ मे सुरू होत आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवास कोईंबतूर एअरपोर्टपासून होत आहे. हे हवाई टूर पॅकेज आहे. या टूर पॅकेजसाठी स्पेशल विमान प्रवास करता येणार आहे. हे टूर पॅकेज ७ रात्री आणि ८ दिवसांचे आहे आणि जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये ३ लोकांना एकत्र प्रवास करता येऊ शकते आणि प्रत्येक व्यक्तीला ४९,४०० रुपये द्यावी लागते.

IRCTC च्या या टूर पॅकेजबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी आणि ते बुक करण्यासाठी, तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था IRCTC कडून केली जाणार आहे. असं असलं तरी, उन्हाळ्यात बहुतेक पर्यटक शिमला, मनाली आणि कुल्लू येथे भेट देण्यासाठी येतात. हे तिन्ही हिल स्टेशन्स अतिशय सुंदर आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *