Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसाचं सूचक विधान ; ”मी पुन्हा ……… ”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. असं वक्तव्य फडणवीसांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Devendra Fadnavis big statement i said i will come again maharashtra politics )

बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

चंदगड येथे फडणवीस बोलत होते. ‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो.’ असं फडणवीस म्हणाले.

एकीकडे शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री फडणवीस असे बॅनर झळकले होते. तसेच, त्यांच्यापूर्वी धाराशिव येथे अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे राज्यात सत्तापालट होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *