महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढउतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठांवरही पाहायला मिळतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण सोबत वाढही सुरू होती.
काल सोन्याचा भाव 880 रुपयांनी तर चांदीचा भाव एक किलो मागे 700 रुपयांनी वाढला होता. त्यात आज ऐन लग्नसराईच्या वेळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,160 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,340 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 771 रूपये आहे. (Gold Silver Price update 5th May 2023)
तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
पुणे – 62,190 रुपये
नागपूर – 62,190 रुपये
चेन्नई – 62,740 रुपये
दिल्ली – 62,340 रुपये
हैदराबाद – 62,190 रुपये
कोलकत्ता – 62,190 रुपये
लखनऊ – 62,340 रुपये
मुंबई – 62,190 रुपये