महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ मे । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे १० जूनपूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या संदर्भात राऊतांच्या बैठका देखील झाल्या आहेत, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले, अजित पवार यांनी पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो. ही राऊत यांची अट आहे. त्यामुळे सातत्याने अजित पवार यांच्या विरोधात ते वक्तव्य करत असतात. अजित पवारांवर ते टीका करत असतात.
उद्धव ठाकरे यांचे काही खरं नाही. त्यांचा स्वत:चा पक्ष राहीला नाही. मला उद्धव ठाकरे परत खासदार बनवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यात काही रस नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी घेतल्याचे नितेश राणे म्हणाले.
शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला. तेव्हा संजय राऊत यांना त्यांच्या व्यासपीठावर जायचे होते. म्हणून ते सकाळपासून ते शरद पवार यांना संपर्क करत होते. मात्र शरद पवार यांच्यासोबत त्यांचा संपर्क होत नव्हता. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय ती संजय राऊत साप आहे. राऊत कोणाचेच नाहीत, असे राणे म्हणाले.