महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत होती. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,008 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,410 रुपये आहे. (Gold Silver Price update 8 May 2023)
अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असाल तर ही दिलासादायक बातमी आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 450 रुपयांची घट दिसून आली.
चांदीच्या दरात किलोमागे 800 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आज म्हणजेच सोमवारी सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असतील तर आज ज्वेलर्सच्या दुकानात हा दर राहील. कारण मंगळवारी सराफा बाजार उघडेल, तेव्हाच नवीन भाव जाहीर होतील.
24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाल्यानंतर इतर कॅरेटमध्येही बदल दिसून येत आहेत. अशा स्थितीत सराफा बाजारातील सोन्याच्या इतर कॅरेटच्या किंमतीमध्ये ही घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,008 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर 45,824 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 35,641 रुपये आहे.
चांदीच्या दरातही घट:
चांदीच्या दरातही घसरण झाली आहे आणि त्यात किलोमागे 800 रुपयांची घसरण दिसून आली. रविवार आणि सोमवारी चांदीचा दर 74,800 रुपये प्रति किलो आहे. गेल्या शनिवारी चांदीचा दर 75,500 रुपये किलोवर पोहोचला होता. तर शुक्रवारी त्याची किंमत 75,050 रुपये होती.