बुलढाणा:कापूस बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी बेकायदेशीर बियाणे आढळल्यास 18002334000 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा- जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. कपाशीचे सरासरी क्षेत्र 2 लक्ष 44 हजार 430 हेक्टर आहे. त्यासाठी मुबलक बियाणे उपलब्ध झाले आहे. बोलगार्ड 2 प्रती पाकिटाचे दर शासनमान्य दर 730 रूपये आहे. शेतकऱ्यांनी कापूस बियाणे बिटी खरेदी करताना दक्षता घ्यावी.

बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे, बियाणे खरेदी करताना सर्व तपशील असलेले पक्के बिल घ्यावे, बियाणे पाकिटावर सरकारमान्य चिन्ह असल्याची खात्री करावी, पाकीटावर लॉट क्रमांक, अंतिम मुदत, वाण, मालाच्या गुणवत्तेचे विवरण असल्याची खात्री करावी. अधिकृत किंमतीलाच बियाणे खरेदी करावे. बियाण्याचे पाकीट सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करूनच खरेदी करावे. अशी जर कोणतीही व्यक्ती, बोगस व बेकायदेशीर बियाणे विक्री करताना आढळल्यास तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती स्तरावर कृषि अधिकारी यांचेशी किंवा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.
अशी पटवा बोगस व बेकायदेशीर बियाण्याची ओळख

असे कापूस बियाणे RR/ ROUND UP BT/ R COT/ BIGBOLL / जादू BG ३/ विड गार्ड आदी नावाखाली विकणे जाण्याची शक्यता आहे. अशा बियाण्यांच्या विक्रीला परवानगी नाही. अशा प्रकारचे बियाणे जास्त दराने विकले जावून त्याची पावती किंवा बिल दिले जात नाही. पावती किंवा बिल दिले असले तर त्यावर लॉट क्रमांक, अंतिम मुदत, वाण आदीचा तपशील नसतो. अशा बियाण्यांच्या पाकीटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे याचा उल्लेख नसतो. पाकीटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसते. पाकीटावर लॉट क्रमांक आदी माहिती हाताने लिहीलेली असते. GOVT approved ऐवजी KISAN APPROVED असे चुकीचे लेबल केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *