महाराष्ट्र २४ – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा- केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेंतर्गत तेनझिंग नार्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2019 करीता नामांकनाचे प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सदर पुरस्काराकरीता नामांकणाचे प्रस्ताव सादर करणा-या खेळाडूंची कामगीरी मागील तीन वर्षामधील म्हणजेच सन 2017, 2018 व 2019 मधील कामगीरी असावी. साहसी उपक्रम हे जमिन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूंची कामगीरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक असून, त्याबाबतची माहीती दोन ते तिन पानामध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तावासोबत सादर करावी. तसेच आवश्यक ती सर्व माहीती कागदपत्रे, प्रमाणपत्रे,कात्रणे इत्यादी सोबत जोडणे आवश्यक राहील.
तरी बुलडाणा जिल्हयातील इच्छूक उमेदवारांनी तेनझिंग नार्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2019 करीता नामांकनाचे प्रस्ताव दि. 10 जून 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी जांभरुन रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.