महाराष्ट्र २४ – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा- केंद्र शासनाच्या वतीने युवकांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालयामार्फत सन 2017-18 व 2018-19 या दोन वर्षाचे राष्ट्रीयस्तरावर राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी नामांकने 26 जून 2020 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर स्विकारण्यात येणार आहेत.
तथापी केंद्र शासनाचे पत्रात नमुद केल्यानुसार राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी व त्याअनुषंगाने प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक पात्रताधारक बुलढाणाजिल्ह्यातील ईच्छूक युवां /संस्था यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून दोन प्रतीत (इंग्रजी नमुन्यामध्ये) आपला परिपूर्ण नामांकन प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी जांभरुन रोड, बुलढाणा येथे दि. 10 जून 2020 पर्यंत सादर करावे तसेच अधिक माहीती करीता या कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.