महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । इपीएस 95 पेन्शन योजनेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हायर पेन्शनसाठी लोक अर्ज करीत आहेत. त्याची मुदत 3 मेपर्यंत होती. ती मुदत आता 26 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. हायर पेन्शनसाठी पेन्शनधारक अर्ज करतात, परंतु हे अर्ज करणारे लोक पात्र कोण, अपात्र कोण हे समजून घेत नाहीत. त्यामुळे जे लोक हायर पेन्शनला पात्र नाहीत, असेही अर्ज भरत आहेत. पात्र, अपात्रतेच्या अटी फार महत्वाच्या आहेत.
सर्व प्रकरणांमध्ये एक प्रकारे सरकार दीनदुबळ्या लोकांकडून पैसे वसूल करण्याच्या विचारात आहे. त्यात त्यांना फरक मिळेल, पेन्शन वाढून मिळेल यात शंका नाही, परंतु आज लोकांची पैसे भरण्याची परीस्थिती नाही. त्यामुळे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली पेन्शनवाढीचा लढा चालू आहे. त्यामध्ये मिनिमम पेन्शन 7, 500 रु., अधिक महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी आहे. कोणालाही एक रुपया भरण्याची आवश्यकता नाही. यासर्व बाबींचा विचार करुनच फार्म भरावा, अन्यथा विनाकारण पैसे वाया घालवू नये, असे मत पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी व्यक्त केले.