सचिन काळभोर ह्यांच्या पुढाकाराने सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला कै. प्रविण काशिनाथ खिल्लारे व सिताराम धोंडू रहाटे यांचे नाव

Spread the love

Loading

संविधानिक मार्गाने पाठपुरावा करत सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या मागणीला अखेर यश

पिंपरी । महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी ।

निगडी यमुनानगर येथील सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला स्व. प्रविण काशिनाथ खिल्लारे व सिताराम धोंडू रहाटे यांचे नाव देण्यात आले. सदर इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे उलटून गेली तरीही या इमारतीचे नामकरण व लोकार्पण कार्यक्रम राजकीय वादामुळे प्रलंबित होता. खिल्लारे व रहाटे यांचे नाव या ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रास देण्यात यावे, सातत्याने अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्यावतीने करण्यात येत होती. अखेर संविधानिक मार्गाने केलेल्या या मागणीस निगडी परिसरातील नागरीकांनी एकजुटीने सहभाग नोंदवित सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचे आभार व्यक्त करत कौतुक केले.

सोमवारी (8 मे रोजी) सुमारे १०० जेष्ठ नागरिक व ५० महिला जेष्ठ यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी रविंद्र खिल्लारे, रोहिदास शिवणेकर, सचिन शिंदे, भाजप शहर महिला उपाध्यक्षा सारीकाताई चव्हाण, मा नगरसेवक सचिन चिखले, शालिनीताई पवार, उमेश सिताराम रहाटे, मनोज लांडगे, रोहित रवींद्र खिल्लारे, सुभाष मुंडे, हैदर भाई शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला स्व. प्रविण काशिनाथ खिल्लारे व सिताराम धोंडू रहाटे ह्याचे नाव जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र म्हणून ठराव क्रमांक ७३४ मंजूर केला होता. मात्र दुसरा ठराव सुमन पवळे यांनी मंजूर करून या दोन वादांमुळे सद्गुरू दत्त उद्यान येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उद्घाटन दोन वर्ष रखडले आहे.

संविधानिक मार्गाने सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा यशस्वी पाठपुरावा…

यमुनानगर येथील सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला स्व. प्रविण काशिनाथ खिल्लारे व सिताराम धोंडू रहाटे यांचे नाव देण्यात यावे म्हणून दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर नगरसेविका सुमनताई पवळे यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र म्हणून नामकरण करण्याच्या ठरावास महापालिकेत सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळवली. मात्र पहिल्यांदा झालेल्या ठरावात बदल का करण्यात आला, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी सतत्याने लावून धरली होती. या मागणीस निगडी, यमुनानगर येथील शेकडो नागरींनी पाठिंबा दर्शविला. नामांतर वादांमुळे नागरिकांनी संतापून जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अखेर उद्घाटन केले. अखेर सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या पुढाकाराने तसेच मार्गदर्शनाखाली सदर इमारतीस खिलारे व रहाटे यांचे नाव देण्यात आले.

सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला स्व. प्रविण काशिनाथ खिल्लारे व सिताराम रहाटे यांचे नाव जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नावाने सुरू करण्यासाठी सुमनताई पवळे यांनी विरोध केल्यामुळे यमुनानगर येथील नागरिकांनी असंतोष व्यक्त करत सचिन काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली खिल्लारे व रहाटे यांचेच नाव देण्यात यावे, अशी ठाम भूमिका घेतली. जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र दोन वर्ष बंद अवस्थेत असून फ क्षेत्रिय अधिकारी सिताराम भवरे यांनी याबाबत अद्याप खुलासा केला नाही?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *