महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे त्यातील चार पाच जे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांपैकी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरलं आहे. कारण उद्दव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही. दुसरं त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं आहे की, अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांचा आहे. अध्यक्षच त्यावर निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले आहेत.