Weather update : पुण्यात आजही Heat wave चा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । पुण्यात आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले असून तापमान 44 अंशाहून अधिक पोहोचलं आहे. सततच्या तापमान वाढीमुळे पुणेकर अक्षरश: हैराण झाले आहेत. दिवसाच नाही तर रात्री देखील उकाड्याने घामाच्या धारा वाहात असल्याने झोपही धड होत नाही.पुण्यात वाढला भयंकर उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. कोरेगाव पार्क – ४४.४, पाषाण ४१.१ तर शिवाजीनगर भागात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आजही शहरात सर्वाधिक तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


ही नोंद आतापर्यंतच्या तापमानातील सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यातील उष्णतेनं नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.आजची वाढ ही यंदाच्या मोसमातील असणार सर्वाधिक असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस शहरात उकाडा कायम राहणार.नागरिकांनी कडक उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. पुणे वेधशाळेने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *