Yuzvendra Chahal IPL 2023 : यजुवेंद्र चहल बनला आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू यजुवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेत सर्वोधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५६ व्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला बाद करून ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला आहे.

ब्राव्होने १६१ सामन्यात १८३ विकेट घेतल्या आहेत. तर चहलने त्याला मागे टाकत केवळ १४३ सामन्यांत ही कामगिरी केली. चहल राजस्थानच्या आधी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून खेळत होता. त्याचवेळी ड्वेन ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे. कोलकाता विरुद्ध चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात २५ धावा देऊन चार विकेट घेतल्या. चहलने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. चहलने आयपीएलमध्ये १४३ सामन्यांत १८७ विकेट्स घेतल्या आहेत.

IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (सामने) :
यजुवेंद्र चहल (१४३) – १८७
ड्वेन ब्रावो (१६१) – १८३
पीयूष चावला (१७६) – १७४
अमित मिश्रा (१६०) – १७२
रविचंद्रन अश्विन (१९६) – १७१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *