“या” कारणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध करण्यात येणार- सचिन काळभोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24  – पिंपरी-चिंचवड – सुनील आढाव

आशिया खंडातील सर्वाधित गतीने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. तसेच, आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या सुमारे 46 वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळाला नसल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती काळभोर यांनी महाराष्ट्र 24 ला दिली.

दरम्यान, या निषेध आंदोलनाची शहभर चर्चा झाल्यामुळे फडणवीस यांचे नियोजित कार्यक्रम रद्द होणार असल्याची चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे. तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रम व लोकार्पण सोहळ्यास काळे झेंडे दाखवून हे कार्यक्रम उधळून लावणार असल्याचा आक्रमक पवित्रा सचिन काळभोर यांनी घेतला आहे.

विशेष बाब म्हणजे, साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून गेल्या ४६ वर्षांपासून पिंपरी चिंचवड येथील शेतकरी बांधव संघर्ष करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना गाजर दाखवून झूलवत ठेवले आहे. गेल्या अधिवेशनात १५ दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येणार म्हणून घोषणा करण्यात आली होती.चार महिने झाले तरी सुद्धा साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून बैठक घेतली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस निरुत्साही आहेत. एव्हढेच काय तर त्यांना या बाबींचा विसरदेखील पडला आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करून करण्यात येणार आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सोडविण्यात यावा. म्हणून मागणी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हास्ते ज्या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रम असेल त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘मेगा ओपनिंग’
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सोमवारी, दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आणि आंद्रा प्रकल्पातील चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण प्रत्यक्ष होणार असून, उर्वरित प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण व भूमिपूजन होईल. त्यासाठी आकुर्डी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *