महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मे । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. कानडी जनतेने भाजपला नाकारले आहे. देशभरात काँग्रेसचा जल्लोष सुरु असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळं भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.( Ajit Pawar tweet on Karnataka Election Result maharashtra politics bjp MVA)
कर्नाटकामधील निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होईल, अस सूचक विधान अजित पवार यांनी ट्विटमध्ये केलं आहे. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे.कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे.@INCIndia @INCKarnataka
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 13, 2023
काय आहे ट्विट?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.