Bailgada Sharyat: ‘हा महाराष्ट्राचा विजय’ ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ मे । बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय सुनावला आहे. बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने दिली आहे. या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, बैल हा धावणारा प्राणी आहे. 

असा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सॉलिसिटर जनरल यांनी हा सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने हा तयार केलेला कायदा पूर्णपणे योग्य ठरलेला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत पूर्णपणे चालणार आहे. हा शेतकऱ्यांचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे.

आम्ही सगळे आनंदी आहोत, या कारवाईच्या दरम्यान आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, राहुल कुल यांनी प्रचंड मेहनत घेतली पाठपुरावा केला. हा महाराष्ट्राचा विजय आहे अनेक लोकांनी यामध्ये सर्वांचे मी आभार करतो. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

दरम्यान डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली सर्व बाजू न्यायालयाने ऐकुन घेतल्या.

सुप्रीम कोर्टाने गुरुवारी तामिळनाडू सरकारच्या कायद्याची वैधता कायम ठेवली आहे, ज्यात राज्यातील पारंपारिक जल्लीकट्टूला परवानगी आहे, असे खंडपीठाने नोंदवले.

न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, “आम्ही विधीमंडळाच्या निर्णयात व्यत्यय आणणार नाही आणि विधिमंडळाने हा राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असल्याचे मत व्यक्त केले आहे. प्रस्तावनेत ते तामिळनाडूच्या संस्कृती आणि वारशाचा एक भाग म्हणून घोषित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *