महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत शाहीर साबळे हा सिनेमा 28 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टीझर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. यावेळी राज ठाकरे सपत्नीक सोहळ्याला उपस्थित होते. राज ठाकरे आणि केदार शिंदे मैत्रीपूर्वक जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. शिवाय शाहीर साबळे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे देखील चांगले संबंध होते त्यामुळे पुढे जाऊन राज ठाकरे आणि केदार शिंदे देखील एकमेकांचे चांगले मित्र झाले. महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या निमित्तानं केदार शिंदे अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यातील एका मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंचा एक किस्सा सांगितला.
राज ठाकरे हे स्वत: उत्तम व्यगंचित्रकार आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्याशिवाय ते उत्तम वॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. सिनेमा, नाटक यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. केदार शिंदे यांच्याबरोबर खास मैत्री असल्याने केदारच्या नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी राज ठाकरे आवर्जुन जात असतं. एकदा राज ठाकरे केदार शिंदेंचं सही रे सही नाटक पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी समोर बसून नाटक पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी नाटक पडद्यामागून पाहायचं आहे असं सांगितलं. राज ठाकरे यांचे बोलणं ऐकून केदार शिंदे यांना देखील थोडा काही सुचलं नाही. पण राज यांनी केदारचं काही ऐकलं नाही. त्यांनी पडद्यामागून सही रे सही हे नाटक पाहिलं.
राज ठाकरेंनी सही रे सही नाटक जेव्हा पडद्यामागून पाहिलं तेव्हाचा किस्सा सांगताना केदार शिंदे म्हणाले, “राज ठाकरे एकमेव आहेत ज्यांनी सही रे सही बॅकस्टेजवरून बघितलं आहे. त्यांनी जेव्हा नाटक मागून पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला नाटक मागून दाखवण्यात काही हरकत नाही पण तुम्हालाही धावावं लागेल. ते म्हणाले काही हरकत नाही. मग हे जेव्हा धावत होते तेव्हा त्यांचे सुरक्षा अधिकारी देखील धावत होते. मी त्यांना म्हटलं अहो, कोणी तरी एकाने धावायला पाहिजे. मग त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना बाजूला बसायला सांगितलं”.
केदार शिंदे पुढे म्हणाले, “आता नाटक सुरू झाल्यानंतर भरत या ठिकाणाहून गेलाय तर तो नंतर कुठून बाहेर येईल हे मला माहिती असायचं. मग मी राजचा हात धरून तिथे घेऊन जायचो आणि दाखवायचो. मग ते बघायचे की, अच्छा भरत इथून येतोय. नाटकाचा फर्स्ट हाफ झाला आणि त्यांनी माझ्या पुढ्यात जोडले आणि म्हणाले, धन्य बाबा. आता सेकंड हाफ बघण्याची माझी हिंमत नाही. हे इतकं कसं लक्षात राहतं तुमच्या”.