सुलभ शौचालयाच्या जागेवर एमएसईबीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा घाट, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनागोंदी कारभार

Spread the love

तात्काळ काम थांबवून या ठिकाणी शौचालय उभारावे, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरी-चिंचवड

निगडी भक्ती-शक्ती येथील अमरधाम स्मशानभूमी समोरील जागवेवर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने सुलभ शौचालय उभारण्यास मंजुरी दिली. यासाठीचे सुमारे 40 टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र 6 महिन्यातच सुलभ शौचालयाचे काम बंद करून त्या ठिकाणी एमएसईबीचे ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम सुरू केले. महत्त्वाची बाब म्हणजे, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी येत असून, संडास बाथरुम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

गेल्या सहा महिन्यापूर्वीच या ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम सुुरू करण्यात आले होते. शहरातील राजकीय मंडळीच्या हस्ते या कामाचे उद्घाटन देखील करण्यात आले होते. मात्र आता नियोजित संडास बाथरूम च्या जागी ट्रान्सफर बसवण्यात येत आहे. फ क्षेत्रिय स्थापत्य विभाग अभियंता काळे यांच्या आदेशानुसार, साठे आणि वाघेरे हे ठेकेदार काम करत आहेत. काळे यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्यामुळे या कामाला परवानगी देण्यात आल्याची चर्चा नागरीकांमध्ये जोर धरू लागली आहे.

अमरधाम स्मशान भूमी निगडी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सुलभ शौचालय नवीन बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणी एसएसईबीचे ट्रांसफॉर्मर बसविण्यात येत असून अमरधाम स्मशान भूमी येथे नागरिकांची गैरसोय होत आहे पुर्वीचे संडास बाथरुम तुटलेल्या अवस्थेत असून नवीन संडास बाथरुम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी यापूर्वीच मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन संडास बाथरुम बांधकामास मंजूरीदेखील दिली होती. मात्र महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे त्या ठिकाणी एमएसईबी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू आहे. परिणामी नागरिकांनी विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. हे काम ताबडतोब थांबविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *