महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मे । मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. पुणेकरांनाही यावर्षा उन्हानं चांगलंच बेजार केलंय.आज पुणे शहराचे हवामान कसे होते ? आजचा उन्हाचा तडाखा जास्त होता की कमी होता? दिवसाचे किमान आणि कमाल तापमान किती होते ? हवा किती शुद्ध होती? याच संदर्भात भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
पुण्याचे शुक्रवारी (19 मे) किमान तापमान 22 अंश,सेल्सियस होते तर कमाल तापमान 39 अंश सेल्सियस एवढे होते.पुण्यात आज (20 मे) रोजी दुपारी 12 नंतर पुण्यातील तापमान 38 अंश सेल्सिअसच्या असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सकाळी तापमान 26 अंश सेल्सिअस असेल आणि निरभ्र आकाश असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.