राज्यामध्ये पेट्रोल पंप, सराफा दुकानांवर दोन हजाराची नोट खपवण्यासाठी नागरिकांची गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मे । एरवी दिवसातून दोन-चार नोटांचे प्रमाण पोहोचले 60 ते 70 वर , राज्यभरात पेट्रोल पंप आणि सराफ बाजारात सध्या २ हजार रुपयांची नोट घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नाशकात तर ५० ते १०० रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठीही थेट २ हजार रुपयांची नोट दिली जात असल्याने त्रस्त पंपचालकांनी किमान ५०० व त्याच्या पटीत इंधन खरेदी केले तरच २ हजारांची नोट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा पेट्राेल डिलर्स वेल्फेअर असाेसिशएनतर्फे ताे अधिकृतपणे जाहीर करताना किरकाेळ खरेदीसाठी २ हजार नाेट स्वीकारली जाणार नसल्याची जाहीर भूमिका घेत तसे फलकच प्रत्येक पंपावर लावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात अाले. विशेष म्हणजे राज्यात जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर एरवी दिवसभरात २ हजार रुपयांच्या ६ ते ७ नोटा येत असत परंतु गेल्या दोन दिवसांपासून त्यात वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *