क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांच्या आशीर्वादामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे जोरात

Spread the love

Loading

बीट निरीक्षकांवरदेखील कारवाई व्हावी, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरीः

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे जोमात आहेत. फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील तळवडे व परिसरातील रेड झोन भागात मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे होत आहेत. क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांच्या आशीर्वादामुळे तसेच, आर्थिक हितसंबंधांमुळे अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. त्यासंदर्भात सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. शहरामध्ये बांधकाम करायचे असेल तर, महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाची परवानगी घ्यावी लागते. महापालिकेकडे किचकट कागदपत्रे व भरमसाट शुल्क न भरता अनेकांनी बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे केली आहेत. काहींनी दोन मजल्यांची परवानगी घेऊन त्यावर आणखी मजले चढवले आहेत. अनधिकृत इमारत बांधताना चारी बाजूला मार्जिन सोडले जात नाही. या इमारती दाटीवाटीने उभ्या केल्या जातात. केवळ तीन ते चार महिन्यात चार-चार मजली इमारती उभ्या केल्या जातात. नियोजनबद्ध नसलेल्या या इमारतींमुळे शहराच्या सौंदर्यात देखील बाधा येते. तसेच, पालिकेवर नागरी सुविधांचा ताण वाढतो.

फ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे आणि संबंधित बीट निरीक्षक अनधिकृत बांधकामांवर कारवाईबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. अनधिकृत बांधकामे करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी बहुरे आणि बीट निरीक्षक सबंधितांकडून आर्थिक रक्कम घेतात. त्यामुळे नोटीस देण्यापलिकडे काही होत नाही. प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने वाढत आहेत. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.

क्षेत्रीय अधिकारी, बीट निरीक्षकांसोबत आर्थिक तोडपाणी…
फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील तळवडे रेडझोन भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे तसेच, बीट निरीक्षक अनधिकृत बांधकामधारकांना केवळ नोटीसा देतात. आर्थिक तोडपाणी झाल्यानंतर कारवाई केले जात नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत. क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे आणि बीट निरीक्षकांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *