‘ही’ इलेक्ट्रिक बाईक एका चार्जमध्ये देते तब्बल ३४४ किलोमीटरची रेंज, स्पीडही भन्नाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ मे । इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असताना, सर्वात आधी आपण तिच्या रेंजचा विचार करतो. देशात अजूनही पुरेशा प्रमाणात चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध नसल्यामुळे, गाडी एका चार्जमध्ये किती किलोमीटर जाते हे पाहणं खूप गरजेचं ठरतं. कित्येक लोक तर केवळ चांगली रेंज नाही म्हणून इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) घेण्याचं टाळतात. तुम्हीदेखील याच कारणामुळे थांबला असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कबीरा मोबिलिटी या इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या कंपनीने आपली नवीन बाईक लाँच केली आहे. KM5000 नाव असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकची खासियत म्हणजे, एका चार्जमध्ये ही बाईक तब्बल ३४४ किलोमीटर धावेल असा दावा कंपनीने केला आहे. पुढच्या वर्षीपासून या गाडीची (Kabira KM5000) डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

स्पीडही भन्नाट
इलेक्ट्रिक गाड्यांना चांगला पिकअप किंवा स्पीड नसतो अशी तक्रार बरेच जण करतात. मात्र, ही गाडी इतर इलेक्ट्रिक बाईक्सपेक्षा भरपूर वेगळी आहे. या गाडीचा टॉप स्पीड हा १८८ किलोमीटर प्रतितास असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या गाडीला मिडनाईट ग्रे, डीप खाकी आणि एक्वामरीन अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे. यावर्षी ही गाडी लाँच करण्यात येईल, तर डिलीव्हरी पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे.

कबीराची ही दुचाकी परफॉर्मन्स आणि सुरक्षेच्या बाबतीत इतर पेट्रोल इंजिन असणाऱ्या दुचाकींप्रमाणेच आहे, असा दावा कंपनीचे सीईओ जयबीर सिवाच यांनी केला आहे. दरम्यान, दमदार मायलेज (Electric Bike with 344 km range) असणाऱ्या या बाईकमध्ये कोणती बॅटरी वापरण्यात आली आहे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

किंमतही जास्तच
टॉप रेंज आणि टॉप स्पीड असणाऱ्या या गाडीची किंमतही तशीच आहे. KM5000 या इलेक्ट्रिक बाईकची एक्स शोरूम प्राईज ही 3,15,000 रुपये आहे. या किंमतीत पेट्रोल इंजिन असणाऱ्या ३५० सीसी क्षमतेच्या गाड्या उपलब्ध होतात. त्यामुळे, पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक गाडी घेण्याकडे ग्राहकांना वळवणे कंपनीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *