३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटेचे काय होणार? आरबीआय गव्हर्नर म्हणतात…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ मे । RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: २००० रुपयांची नोट वितरणातून बंद केल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयचा २००० रुपयांची नोट आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलून त्या जमा केल्या जातील, यासाठी चांगली प्रणाली कार्यरत आहे. जेणेकरून सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. एका पत्रकारानं ३० सप्टेंबरनंतर नोटेचे काय होणार असे विचारले असता ते म्हणाले, ३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत, असे आम्ही काहीही म्हटलेले नाही.

नोटाबंदीनंतर काढलेल्या नोटांची भरपाई करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. आता बाजारात अधिक मूल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने त्या वितरणातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील आणि ती ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये सहजपणे जमा केली जाईल आणि बदलली जाऊ शकते.

आरबीआय गव्हर्नरची पहिली प्रतिक्रिया
मुंबईत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याबाबत सांगितले की, चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, लोक सहज नोट बदलू शकतात. तुम्ही आरामात नोट बदलून घेऊ शकता. ४ महिने ही बाब गांभीर्याने घेण्याची वेळ आहे. नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे. जुन्या नोटा बदलून देण्यावर घातलेल्या बंदीला अडचण मानू नका. भारताची चलन व्यवस्थापन प्रणाली अतिशय मजबूत आहे. ५०० रुपयांच्या आणखी नोटा चलनात आणण्याचा निर्णय जनतेच्या मागणीवर अवलंबून असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *