मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट : तब्बल १०० ई-शिवनेरी बस धावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ मे । मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई – पुणे या मार्गावर १०० ईलेक्ट्रिक बसेस धावणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहनकडून देण्यात आली आहे. सध्या दादर, ठाणे आणि पुणे या मार्गावर २५ इलेक्ट्रिक बसेस आहेत. या ईलेक्ट्रिक बसेसमध्ये वाढ करण्यास नऊ महिन्याचा विलंब झाला असून आता मात्र या कामाला वेग आला आहे.

येत्या काळात १०० ई – शिवनेरी बसेस मुंबई – पुणे मार्गावर धावणार आहेत. सध्या अशा २५ बस कार्यरत आहेत. पहिल्या ई-शिवनेरी बसचं उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी करण्यात आलं होतं. एसटी बसचा मुंबई–ठाणे-पुणे मार्गावर १०० शिवनेरी ई बसेस धावणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण १० ई-बस दर पंधरा मिनिटांनी दादर शिवनेरी बस स्टँड ते पुणे या मार्गावर धावतात. ठाणे आगार ते पुणे मार्गावर १५ बस चालवल्या जातात. या आठवड्यात १५ ई-शिवनेरी बस ताफ्यात सामील होणार आहेत. तर जून महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई – पुणे मार्गावर ६० ई-शिवनेरी बस सुरू केल्या जातील.

मुंबई – पुणे शिवनेरीचं भाडं किती?
येत्या काळात मुंबई – पुणे शिवनेरीचं भाडं ३५० रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी माहिती आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहनची मान्यता मिळाल्यानंतर हे भाडं लागू केलं जाईल.

ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई – पुणे या शिवनेरी एसी बसचं भाडं तिकिटामागे ७५ रुपयांनी वाढवण्यात आलं होतं. त्यावेळी हे भाडं ४५० रुपयांवरुन ५२५ रुपये इतकं करण्यात आलेलं.

सध्या ठाणे आगार ते पुणेसाठी शिवनेरी एसी बसचं पुरुषांसाठीचं तिकीट ५१५ रुपये इतकं आहे, तर महिलांसाठी २७५ रुपये आहे.

फास्ट चार्जिंगची सुविधा

शिवनेरी ई-बससाठी महाराष्ट्र राज्य परिवहनकडून चार्जर इन्स्टॉल करण्यात आले असून या फास्ट चार्जिंगद्वारे केवळ दोन तासात ई-बस चार्ज होते. ई-बस एकावेळी दोन तास चार्ज झाल्यानंतर ती ३०० किलोमीटरपर्यंत धावते.

या आधी मुंबई – पुणे मार्गावर डिझेलवर धावणाऱ्या एसी बसेस होत्या. यामुळे प्रदूषण वाढ होत असल्याने आता मुंबई – पुणे मार्गावर असलेल्या बसेस डिझेसवरुन इलेक्ट्रिक करण्यावर भर असल्याचं, महाराष्ट्र राज्य परिवहनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *