Royal Enfield Electric Bike : रॉयल एनफिल्डच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती ; लवकरच येणार ‘इलेक्ट्रिक बुलेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मे । आपल्या दमदार बाईक्ससाठी रॉयल एनफिल्ड कंपनी देशात प्रसिद्ध आहे. या कंपनीची बुलेट बाईक तर स्टेटस सिम्बॉल समजली जाते. रॉयल एनफिल्डनेच भारतात पहिल्यांदा डिझेल बाईक लाँच केली होती. आता हीच कंपनी थेट इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. एनफिल्डचे सीईओ बी. गोविंदराजन यांनी या बाईकबद्दल महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.


“ईव्हीच्या प्रवासात आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत. रॉयल एनफिल्डचा ईव्ही प्रवास सध्या टॉप गिअरमध्ये आहे. रॉयल एनफिल्डचा मजबूत डीएनए आणि इलेक्ट्रिक फीचर्स हे एकत्र करून एक खास इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” असं गोविंदराजन म्हणाले.

कधी होणार लाँच?

रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक (Royal Enfield first Electric bike) पुढच्या वर्षीपर्यंत लाँच होऊ शकते. सध्या या बाईकला ‘कोडनेम एल’ असं नाव देण्यात आलं आहे. ही एक संपूर्ण सीरीज असणार आहे, असं कंपनीच्या सीईओंनी सांगितलं. या सीरीजमधील गाड्यांना सध्या एल१ए, एल१बी आणि एल१सी अशी नावं देण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *