महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मे । Gold Silver Rate: तुम्हालाही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोने 60,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 71,000 रुपये प्रति किलोच्या खाली विकली जात आहे.
या व्यापार आठवड्यात मंगळवारी सोने प्रति 10 ग्रॅम 487 रुपयांनी स्वस्त होऊन 60342 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याआधीच्या व्यवहारात सोमवारी सोन्याचा भाव 554 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागला आणि 60829 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.
14 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव:
यानंतर 24 कॅरेट सोने 60,275 रुपये, 23 कॅरेट 60,034 रुपये, 22 कॅरेट 55,212 रुपये, 18 कॅरेट 45,206 रुपये आणि 14 कॅरेटचे दर 35,261 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.