IPL 2023 Qualifier1 : पुढील आयपीएल खेळणार का ? माही म्‍हणाला, “निवृत्ती …”

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मे । पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) IPL 2023 Qualifier1सामन्‍यात गुजरात पराभव करत मंगळवारी चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघाने दिमाखात फायनलमध्‍ये धडक मारली आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्‍या अचूक रणनीतच्‍या जोरावर हार्दिक पंड्याच्‍या गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्‍यानंतर महेंद्रसिंह धोनी याने आपल्‍या निवृत्तीवर भाष्‍य केले.


IPL 2023 Qualifier1 : सामना संपल्यानंतर धोनी काय म्हणाला?
यंदाच्‍या आयपीएल हंगाम सुरु झाल्‍यापासूनच धोनीच्‍या निवृत्तीच्‍या चर्चा रंगली होती. चेन्‍नई संघाने फायनलमध्‍ये धडक मारल्‍यानंतर त्‍याने आपल्‍या निवृत्तीच्‍या प्रश्‍नावरील मौन सोडले. धोनी म्‍हणाला, आयपीएलच्‍या पुढील लिलावास आणखी आठ ते नऊ महिने शिल्लक आहेत. त्‍यामुळे माझ्‍याकडेही पुढील आयपीएलमध्‍ये खेळायचे का याबाबत निर्णय घेण्‍यासाठी आठ-नऊ महिने शिल्लक आहेत. अशा स्थितीत मला घाईघाईने निर्णय घ्यायचा नाही. ( IPL 2023 Qualifier1 )

आयपीएल ही मोठी स्पर्धा आहे. या स्‍पर्धेत पूर्वी आठ संघ असायचे, आता १० संघ खेळतात. यंदाच्‍या हंगामात येथेपर्यंत पोहचण्‍यासाठी आम्‍हाला दोन महिने लागले. यासाठी संघाशी जोडलेले गेलेल्‍या सर्वांनी योगदान दिले आहे, असेही त्‍याने यावेळी सांगितले.

मी नेहमीच ‘सीएसके’सोबत असेन
पुढील वर्षी आयपीएलमध्‍ये खेळायचे का, या प्रश्‍नावर माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी आठ ते नऊ महिने आहेत. पुढील लिलाव एकतर या वर्षी डिसेंबरमध्ये किंवा पुढील वर्षी जानेवारीमध्ये आहे. अशा स्थितीत आतापासूनच त्याची डोकेदुखी का घ्या. मी खेळलो किंवा नसो, मी नेहमीच सीएसकेसोबत असेन. खेळाडू म्हणून किंवा बाहेरून (कर्मचारी) खेळाडूला मदत करत राहीन, असेही धोनीने यावेळी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *