Death – टीव्ही इंडस्ट्रीला धक्का; आठड्याभरात तिसऱ्या कलाकाराची अचानक एक्झिट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मे । टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून आठवड्याभरात तीन बड्या कलाकारांनी जीवनाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली आहे. अभिनेता आदित्य सिंग राजपूत, अभिनेत्री वैभवी उपाध्यायनंतर आता अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey Death) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नितेश पांडे यांचे कार्डियक अरेस्टने निधन झाले. ते 51 वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अनुपमा’ या गाजलेल्या मालिकेमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविका हिच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितिश पांडे यांचे निधन झाले. नाशिकजवळील इगतपुरी येथे ते चित्रिकरणासाठी गेले होते. येथे रात्री दोनच्या सुमारास त्यांना कार्डियक अरेस्ट आला यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नितेश यांचा मेहुणा आणि लेखक सिद्धार्थ नागर यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे.

माझी बहीण अर्पिता ही शॉकमध्ये आहे. नितेशचे वडील इगतपुरीला रवाना झाले आहेत. आम्ही सर्वजण सुन्न झालो आहोत. निधनाबद्दल समजल्यानंतर मी माझ्या बहिणीशी एक शब्दही बोलू शकलो नाही. मी देखील इगतपुरीला जाणार आहे. दिल्लीहून परत येत असताना मला हे वृत्त समजले. नितेश माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान होता. आयुष्य भरभरून जगणारा होता. त्याला हृदयरोगाचा कधी त्रास जाणवला असेल, असे मला वाटत नाही, अशी माहिती नागर यांनी भरल्या गळ्याने दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *