HSC Result: बारावीचा निकाल कुठे, कसा तपासायचा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मे । HSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी २ नंतर उपलब्ध होणार आहेत.

कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

www.mahresult.nic.in

https://hscresult.mkcl.org/

https://hsc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

HSC Result 2023: असा पाहा निकाल
स्टेप १) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.


स्टेप २) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे इंटरनेट नसले तरीही निकाल सर्वात आधी तुमच्या थेट मोबाइलमध्ये येऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुमच्या मोबाईलमधून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे. याच्या सुरुवातीला कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करुन त्यापुढे रोल नंबर टाइप करावा लागेल. हा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *