महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मे । Bank Holidays List in June 2023: मे महिना संपत आला असून आता काही दिवसांतच जून महिना सुरू होणार आहे. त्यातच आता जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जून 2023 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.
जूनमध्ये बँकांना (Bank) पुढील महिन्यात म्हणजे जून मध्ये 12 सुट्या असणार आहेत. या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकेची कामे करता येतील. जूनमधील 12 सुट्ट्यांमध्ये शनिवार व रविवारच्या 6 साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. म्हणजेच या व्यतिरिक्त उर्वरित सहा दिवस बँक सण आणि वर्धापन दिनानिमित्त बंद राहणार आहेत.
आजकाल बँकेची बहुतांश कामे घरी बसून केली जातात, पण तरीही अनेक कामांसाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. अशा परिस्थितीत, बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमची गैरसोय टाळता येईल. जाणून घेऊया जून 2023 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील? (Bank Holiday)
जूनमध्ये या किंवा त्या दिवशी बँका बंद राहतील –
4 जून 2023 : रविवारमुळे बँका बंद राहतील.
10 जून 2023 : दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी
11 जून 2023 : रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी
15 जून 2023 : राजा संक्रांतीच्या निमित्ताने मिझोराम आणि ओडिशामध्ये गुरुवारी बँका बंद राहतील.
18 जून 2023 : रविवारमुळे बँका बंद
20 जून 2023 : गुरुवारी, रथयात्रेमुळे ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
24 जून 2023 : चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल.
25 जून 2023 : रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
26 जून 2023 : खारची पूजा, फक्त त्रिपुरा राज्यात बँका बंद राहतील.