![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मे । नवी दिल्ली येथे २८ मे रोजी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या इमारतीचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान हा क्षण स्मरणात राहावा यासाठी या दिवशी अर्थ मंत्रालयाकडून विशेष ७५ रुपयांचे नाणे लॉन्च करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नाण्यावर या नवीन संसद भवनाची प्रतिमा सेच त्याचे नाव देखील देण्यात येईल. नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Ministry of Finance to launch a special Rs 75 coin to commemorate the inauguration of the new Parliament building on 28th May. pic.twitter.com/NWnj3NFGai
— ANI (@ANI) May 26, 2023
कसे असेल नाणे?
अधिसूचनेनुसार ७५ रुपयांचे नाणे गोल आकारचे असेल. याचा व्यास ४४ मिलीमिटर आणि काठ २०० सेरेशन असेल. ७५ रुपयांचे हे नाणे चार धातूंपासून बनवले जाईल. ज्यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकल, आणि ५ टक्के झिंक वापरले जाणार आहे. तसेच यावर नवीन संसद भवन इमारतीखाली २०२३ देखील लिहीलेलं असेल.
