महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मे । चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, निवृत्तीमुळे चर्चेत असणारा धोनी सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना यांच्या घरच्यांनी धोनीला भेट दिली इतकेच नव्हे तर यावेळी धोनीने बहिण विषूका पथिराना हिला वचनदेखील दिले.
महेंद्र सिंह धोनीचे सहकारी खेळाडूंशी नेहमीच खास नाते असते. तो त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवतो आणि एकदा एखाद्या खेळाडूवर विश्वास ठेवला की तो त्याची सोबत सोडत नाही. दरम्यान, 20 वर्षीय मथिशा पाथिरानाच्या कुटुंबीयांनी धोनीची चेन्नईमध्ये भेट घेतली, त्यातील काही फोटो मथिशाची बहीण विशुखाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.
https://www.instagram.com/vishuka_pathirana/?utm_source=ig_embed&ig_rid=8f39aa94-f859-4dd6-ba54-5b2868c10755
या खास क्षणांचे फोटो शेअर करताना विशुखाने खास कॅप्शनदेखील दिली आहे. “आता आम्हाला खात्री आहे की मल्ली (मथिशा पाथीराना) सुरक्षित हातात आहे. जेव्हा थाला म्हणाला की, तुम्हाला मथिशाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तो नेहमी माझ्यासोबत असतो. हा क्षण माझ्यासाठी माझ्या स्वप्नांच्या पलीकडचा होता.” अशा भावना विशुखाने धोनीच्या भेटीनंतर व्यक्त केली आहे.
पाथीरानाने कसोटी क्रिकेट खेळू नये; धोनीचा सल्ला
धोनीने नुकताच मथिशा पाथिरानालाही एक सल्ला दिला होता. पाथीराना हा महान डेथ ओव्हरचा गोलंदाज आहे. त्याची अॅक्शन अशी आहे की त्याला पकडणे कोणत्याही फलंदाजाला कठीण जाते. अशा परिस्थितीत माझा त्याला सल्ला असेल की, जर त्याला त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दीर्घकाळ टिकवायचे असेल तर सामना खेळू नये.
