महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ मे । महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या बोर्ड (HSC Board Result) परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मुंबईचा निकालाचा टक्का घसरलेला असतानाच या निकालावर कोकणकरांचं वर्चस्व पाहायला मिळालं. वर्षभराच्या मेहनतीनंतर विद्यार्थ्यांच्या हाती निकाल आला आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकिर्दीच्या वाटा मोकळ्या झाल्या. याच सर्व विद्यार्थांसाठी ही महत्त्वाची बातमी.
(Mumbai University) मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यांलयांमध्ये पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 27 मे (शनिवार) 2023 पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी 12 जून 2023 या अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
मुंबई विद्यापीठ किंवा विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयात पदवी किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशाआधी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करणं अपेक्षित आहे.
कोणत्या पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेची नोंदणी करू शकतात?
प्रथम वर्ष बीए, बीएससी, बीकॉम (फायनान्शियल मार्केटिंग, अकाऊंटिंग अँड फायनान्स, बँकिंग अँड इन्श्युरन्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएएमएमसी, बी एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच), बीए (जर्मन), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए- एमए, बीएमएस, बीएससी (आयटी, कम्प्युटर सायन्स, हॉस्पिटलिटी स्टडीज, मायक्रोबायोलॉजी, बायो केमिस्ट्री, बायो टेक्नोलॉजी, नॉटिकल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, एरॉनॉटिक्स, डेटा सायन्स, एविएशन, ह्युमन सायन्स), बी व्होक, टुरिझम अँड ट्रॅवल मॅनेजमेंट, बीपीए (संगीत), एफवायबीएससी या आणि अशा अनेक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेश नोंदणी करु शकतात.
कधी जाहीर होणार यादी?
बारावीचा निकाल पुढील शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यासोबतच नव्या वर्षासाठीचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनामुळं आलेल्या अनियमिततेला दूर लोटत एक संतुलिक वेळापत्रक तयार करण्याकडे सर्वच महाविद्यालयं आणि विद्यापीठाचा कल दिसून आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज केल्यानंतर महाविद्यालयांची पहिली प्रवेश यादी 12 जून, दुसरी यादी 28 जून आणि तिसरी यादी 6 जुलै रोजी हीर करण्यात येईल.
अर्ज भरण्यासाठीच्या सूचना
प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांनी https://mumoa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. इथं विद्यार्थ्यांनी नोंदणी करत माहितीचा तपशील भरावा.
नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांकावर User Id आणि Password येईल.
पुढच्या पायरकीवर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि स्वत:बद्दची माहिती भरावी.
फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
सर्व माहिती आणि फोटो जोडल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेत असणाऱ्या अभ्यासक्रमांची नोंद करावी.
प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठ किंवा संलग्न विद्यापीठांचा पसंतीक्रम विद्यार्थी निश्चीत करु शकतील.