पुणे लोकसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादीच लढवेल, अजित पवारांचे बाळासाहेब थोरातांना जशास तसे प्रत्युत्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मे । पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात पुणे लोकसभेची निवडणूक काँग्रेसच लढवले, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्याला जशात तसे प्रत्युत्तर देताना पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

पुण्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक

आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, पुणे लोकसभेची निवडणूक कोणत्या पक्षाने लढवायची, याचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते चर्चा करून घेतील. मात्र, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याने ही जागा राष्ट्रवादीने लढवावी, अशी आमची इच्छा आहे. बाळासाहेब थोरात म्हणत असतील ही जागा काँग्रेस लढवेल. तर, मीही ठामपणे सांगतो की, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल.

काँग्रेसला जिंकता आले नाही

काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर कुणाचे आमदार-खासदार जास्त आहेत, हे पाहिले पाहिजे. काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही

जागांची अदलाबदल करायला हवी

अजित पवार म्हणाले, एखाद्या मतदारसंघात एखाद्या पक्षाची जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथे जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरकडे जर अशी उलट परिस्थिती असेल, तेव्हाही असे घडलं पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?

बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपावर भाष्य केले होते. बाळासाहेब थोरात म्हणाले होते, पुणे लोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेसने लढवली होती आणि पुन्हा काँग्रेसच लढेल. दुसरीकडे, अजित पवारांनीही पुणे लोकसभेच्या जागेवर दावा सांगितल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *