सतत धोनी-धोनी नाव ऐकून अखेर कपिल देव बोलले …. तो काय आयुष्यभर खेळणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मे । इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये दोन टीम भिडणार आहेत. गुजरात आणि चेन्नईची टीम आमने-सामने असेल. सर्व फॅन्सच्या मनात एकच प्रश्न आहे, यावेळी आयपीएल चॅम्पियन कोण बनणार?. त्याशिवाय हा एमएस धोनीचा शेवटच सीजन आहे का? असा प्रश्न सुद्धा कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. धोनी पुढचा सीजन खेळणार का? याची चर्चा सोशल मीडियापासून मेन स्ट्रीय मीडियामध्ये आहे.

भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचे कॅप्टन कपिल देव सततच्या या प्रश्नांमुळे वैतागले सुद्धा. त्यांनी फॅन्सला सरळ प्रश्न विचारला, तुम्ही सतत धोनीबद्दलच का बोलताय? तो काय आयुष्यभर खेळणार?

कपिल देव काय म्हणाले?
आपण सर्वांनी धोनीच आभारी असलं पाहिजे. तो मागच्या 15 वर्षांपासून खेळतोय. कपिल देव यांच्यामते, धोनी पुढच्यावर्षी खेळो किंवा नको, त्याने आपल काम केलय. कॅप्टन म्हणून त्याने पुन्हा एकदा चेन्नईला फायनलमध्ये पोहोचवलय. धोनीने पुन्हा एकदा कॅप्टनशिपच महत्व अधोरेखित केलय.

धोनी स्वत: काय म्हणाला?
धोनीला सुद्धा हा प्रश्न विचारला गेलाय, तू पुढच्या सीजनमध्ये खेळणार का?. धोनीने यावर उत्तर सुद्धा दिलं. विचार करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे, असं धोनीने उत्तर दिलं. पुढच्या मिनी ऑक्शनसाठी अजून बराचवेळ आहे. मी चेन्नईसोबत असणार, हे धोनीने स्पष्ट केलय.

सेहवागच धोनीबद्दल मोठं वक्तव्य
वीरेंद्र सेहवागने सुद्धा धोनी बद्दल मोठ वक्तव्य केलय. धोनी कॅप्टन नसेल, तर मी खेळणार नाही. इम्पॅक्ट प्लेयरचा रुल धोनीला अप्लाय होत नाही. कारण तो आपल्या कॅप्टनशिपमुळे खेळतोय. आता धोनी काय निर्णय घेणार त्याची उत्सुक्ता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *