संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी व्हावी

Spread the love

Loading

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरीः
यंदा जगद्गगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा दिनांक ११ जून २०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने हेलिकॉप्टरने पुष्पवष्टी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. संत तुकाराम महाराज पालखी निमित्ताने हजारो वारकरी बांधव देहू ते पंढरपूर पायी वारी प्रवास करुन विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने जातात. कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा स्थगित करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रशासनाने सर्व निर्बंध हटल्यामुळे यंदा पालखी सोहळा वारकरी भाविक जल्लोषात साजरा करणा हे मात्र नक्की. त्यामुळे या वर्षी हेलिकॉप्टरने या पालखीसोहळ्याचे स्वागत व्हावे, अशी सामाजिक कार्यकर्ते काळभोर यांची मागणी आहे.

वारकरी बांधव मोठ्या प्रमाणावर देहू ते पंढरपूर पायीवारी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी ताबडतोब दखल घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत हेलिकॉप्टरने पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या स्वखर्चाने करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहरसामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

वारी हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र कोरोना महामारीमुळे प्रशासनाने लादलेल्या निर्बंधामुळे सलग दोन वर्षे वारी झालीच नाही. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य संचारले होते. गेल्या वर्षापासून पंढरीची वारी पूर्ववत झालेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत व्हावा, वारकऱ्यांचा शिण जावा, पायी चालण्यास त्यांना बळ मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या साठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिका दरवर्षी योग्य त्या उपाययोजना करत असतेच. त्याचा एक भाग म्हणून या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचे आयोजन करावे, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *