WhatsApp New Update : व्हॉट्सअ‍ॅप की,इन्स्टाग्राम? नव्या फीचरने व्हाल कन्फ्युज; जाणून घ्या सविस्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० मे । WhatsApp Buisness New Features : Meta चे WhatsApp Business वापरकर्त्यांना लवकरच एक नवीन फीचर देण्यात येणार आहे. व्यावसायिकांसाठी हे अतिशय उपयुक्त आणि वेळ वाचवणारे फीचर ठरणार आहे. मेटा इंस्टाग्रामवर या प्रकारचे फीचर आधीच दिलेले आहे.

वास्तविक, कंपनी व्हॉट्सअॅप (Whatsapp) बिझनेसवर स्टेटस Archive Option देण्यात येणार आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स पुढील 30 दिवस त्यांचे स्टेटस Archive करू शकतील. हे फीचर इंस्टाग्राम स्टोरी सारखे आहे जिथे यूजर्सना स्टोरी आर्काइव्ह करण्याचा पर्याय मिळतो.


Wabetainfo ही वेबसाइट (Website) व्हॉट्सअॅपच्या विकासाचे अपडेट्स देत असते. तसेच WhatsApp Businessचे काही अपडेट या वेबसाईटवर शेअर केले आहेत. सध्या, काही बीटा परीक्षकांसाठी स्टेटस आर्काइव्हचे फीचर जारी करण्यात आले आहे. एकदा ते सगळ्यांसाठी आणले की, तुम्हाला या अपडेटबद्दल एक पॉप-अप मिळेल आणि तुम्हीही व्हॉट्सअप अपडेट करण्यात सक्षम व्हाल. जर तुम्हाला भविष्यासाठी स्टेटस सेव्ह करायचे नसेल तर तुम्ही हा पर्यायही बंद करू शकता.

नवीन अपडेटमुळे व्यवसायाला फायदा होईल की तुम्हाला तुमच्या ग्राहकाचा शोध घेऊन तीच जाहिरात किंवा फोटो पुन्हा पुन्हा पोस्ट करावा लागणार नाही. तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधून कधीही ते सहजपणे पोस्ट करू शकता.


हे फीचर लवकरच येईल –
मेटा (Facebook) लवकरच लोकांना WhatsApp वर Instagram सारखे फीचर देणार आहे. कंपनी वापरकर्त्यांसाठी फीचर रोलआउट करणार आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या वापरकर्त्यांच्या नावाच्या मदतीने तुमची संपर्क माहिती इतरांना देऊ शकाल.

युजरनेम आल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर पुन्हा पुन्हा देण्याची गरज भासणार नाही आणि नंबर न जोडता तुम्ही तुमची माहिती सहजपणे शेअर करू शकाल किंवा तुमची स्वतःची माहिती इतरांना पाठवू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *