पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती ; महादेवाच्या अभिषेकाने जयंती उत्सवाला सुरुवात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी पाच वाजता येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.

आज होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदिया, इंदूरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासकीय जयंती कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे असून त्यांच्या हस्तेच आज सकाळी महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात यानिमित्त विविध शासकीय तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जयंती उत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे यांच्या हस्ते चौंडी येथील मंदिरात महादेवाला सकाळी 5.30 वाजता जलाभिषेक करण्यात आला.

राजकारणाचा प्रयत्न करू नका – राम शिंदे यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करताना सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. यावर बोलताना आमदार राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *