मावळमधून बारणेंना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची लेक भिडणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जून । मावळ लोकसभा मतदारसंघ… २०१९ च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार मैदानात होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आणि राजकारणामध्ये पवार कुटुंबातील सदस्याचा हा पहिलाच पराभव ठरला. ज्या पराभवाचे शल्य आजही पवारांसह राष्ट्रवादी पक्षाला कायम आहे. आता बारणे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने मतदारसंघातील राजकीय गणित फिरलीयेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली जात असताना मावळसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन काय? हा आता समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मुलगी बारणेंविरोधात उतरण्याची शक्यता आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, उरण आणि कर्जत या सहापैकी पाच मतदारसंघाच्या ‘बुरजां’वर श्रीरंग बारणेंनी २०१९ ला मताधिक्‍य मिळविले. तर केवळ कर्जत या एकमेव मतदारसंघावर प्रभाव ठेवण्यास राष्ट्रवादी यशस्वी झालं. मात्र बारणेंनी आता शिंदे गटात प्रवेश केल्याने मावळ लोकसभेची जागा २०२४ ला आघाडीत राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवडसह मावळातील पदाधिकाऱ्यांनी केलीये. या जागेवर राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या माजी मंत्री आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळण्याच्या चर्चा राष्ट्रवादीत सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *