पेट्रोल डिझेल दरात वाढ; मुंबईत पेट्रोल ८० रुपयांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – पेट्रोलियम कंपन्यांनी केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बुधवारी वाढ केली आहे. मुंबईत मंगळवारी पेट्रोल दर ७९.४९ रुपये होता. तो आज ८०. ०१ रुपये झाला. त्यात ५२ पैशांच वाढ झाली. डिझेलच्या भावात देखील ५५ पैशांची वाढ झाली आहे. डिझेलचा आजचा दर ६९.९२ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ७३ रुपयांवर गेले आहे. त्यात ५४ पैशांची वाढ झाली. डिझेल ७१.१७ रुपये झाले आहे. त्यात ५८ पैशांची वाढ झाली. मंगळवारी तो ७०.५९ रुपये होता.


एप्रिल महिन्यात देशभरात ९,७३,००० टन पेट्रोलची विक्री करण्यात आली होती. एप्रिल २०१९च्या तुलनेत एकूण पेट्रोलविक्रीत ६१ टक्के घट झाल्याच नोंदविण्यात आले होते. त्याचप्रमाणे डिझेलविक्रीही मे महिन्यात वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी घटून ४८.१ लाख टनांवर राहिली आहे. एप्रिल महिन्यात देशभरात ३२.५ लाख टन डिझेलची विक्री झाल्याचे नोंदविण्यात आले. ही विक्री एप्रिल २०१९च्या तुलनेत ५६.५ टक्क्यांनी घटली आहे. वार्षिक आधारावर विमानाच्या इंधनाची विक्रीही मे महिन्यात ८५ टक्क्यांनी घसरून केवळ ९,६०० टनांवर आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. करोना आणि लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला होता. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. त्यानुसार जर देशात लॉकडाउनचा कालावधी वाढवला पण केंद्र सरकारने परवानगी दिली तर कंपन्यांनी दररोज पेट्रोल आणि डिझेल दराचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तशी कृती आता पेट्रोलियम कंपन्यांकडून केली जात आहे.

सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या महिनाभरात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल ४० डॉलरच्या पुढे आहेत. देशातील पेट्रोल डिझेलचे भाव जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्या इंधन दर निश्चित करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *