महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड -आज मुंबई मध्ये मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री.अजित दादा पवार यांची भेट घेत नांदेड दक्षिण मतदारसंघातील तसेच लोहा कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी विना सुविधा कापूस केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा करत मार्ग काढला माझी शेतकरी हिताची मागणी लक्षात घेता उद्या यावर मार्ग निघण्याची शक्यता असून , यासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 10 जून रोजी दुपारी ठीक १२:३० वा. विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीसाठी माझ्यासह अन्य लोकप्रतिनिधी संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लोहा येथे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी नसल्यामुळे या तालुक्यात कापूस उत्पादक पणन महासंघाचे एकही खरेदी केंद्र नाही. परंतु या तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात केलाजात असून येथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या लोहा शेतकऱ्यांची संख्या 6153 इतकी आहे व इतर तालुक्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता येथे कापूस केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी मा.आमदार मोहनअण्णा हंबर्डे स्वतः मुंबई येथे रवाना झाले आहेत मा.मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात वेळ देऊन लोहा येथील विना सुविधा कापूस केंद्र सुरु करण्यासाठी उद्या मान्यता देण्याची शक्यता आहे. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच मला जनतेने बहूमतांनी निवडून दिले आहे. मा. ना. अशोकराव चव्हाण साहेबांनी माज्या सारख्या सामान्य कार्यकत्यास आमदार बनवले या संधीचा मी माज्या व लोहा कंधार मतदार संघात गेली कित्येक वर्ष मनावा तसा विकास झाला नाही. जे जे आवश्यक आहे ते ते मी आधी शेतकार्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देऊन मंत्रालयात पाठपुरावा करून आणल्या शिवाय गप्पबसणार नाही. मी माज्या जनतेस वीज. पाणी. घरकुल. रस्ते हे आधी उत्तम दर्जाचे करून मतदार संघांचा सर्वांगीण विकास करून देणे हे माझे अध्यकर्तव्य आहे. असे उदगार त्यांनी प्रतिनिधीस बोलताना केले आहेत.