राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार ; 19 जूनपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुन । गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी अनेक इच्छूक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा समोर येत आहेत. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, शिवसेनेच्या वर्धापन दिना आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत मांडल्याची बातमी न्यूज 18 लोकमतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *