ICC T20 World Cup : ‘या’ देशात खेळवला जाणार टी २० वर्ल्ड कप २०२४

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुन । टी २० विश्वचषकाचे सामने कोणत्या ठिकाणी खेळवले जातील यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु आता शुक्रवारी, टी २० विश्वचषक २०२४ बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत या मेगा इव्हेंटसाठी पायाभूत सुविधा अद्याप तयार करण्यात आलेली नाही, ज्यामुळे हे सामने इग्लंड आता इंग्लंडमध्ये खेळवले जाऊ शकतात, असं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र आता आयसीसीनं यावरील मौन सोडत हे रिपोर्ट फेटाळले आहेत.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे आयोजित करत आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी जूनमध्ये पार पडणार आहे. आयसीसीसोबतच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड अर्थात ईसीबीनेही या वृत्ताला दुजोरा दिलाय.

‘आयसीसी मेन्स टी-२० विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि यूएसएमधून मध्ये हलवण्यात येणार असल्याच्या या वृत्तांमध्ये तथ्य नाही. हा कार्यक्रम आयसीसीनं आयोजित केला असल्यानं, त्याचंच विधान निर्णायक मानलं पाहिजे, असं ईसीबीच्या प्रवक्त्यानं सांगितल्याचं क्रिकबझनं म्हटलंय. “२०२४ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील सामने जून महिन्यात खेळवले जाणार आहेत. फक्त इंग्लंड हे त्याचे इतर संभाव्य ठिकाण आहे. जर ईसीबी हे इव्हेंट आयोजित करेल का असा कोणी प्रश्न विचारला तर त्याचं स्पष्ट उत्तर नाही असंच असेल. त्यामुळे यासाठी कोणत्याही शक्यता निर्माण होत नाहीत,” असं आसीसीच्या एका सदस्यानं या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं.

नव्या स्वरुपात स्पर्धा
यावेळी ही स्पर्धा नव्या स्वरूपात आयोजित केली जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या मेगा स्पर्धेत २० संघ सहभागी होणार असून एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची तयारी आधीच सुरू करण्यात आलेली आहे आणि खेळाच्या ठिकाणांची तपासणी पूर्ण झाली असल्याचं यापूर्वी आयसीसीनं म्हटलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *