राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर व शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – शिवश्री देवराव लुगडे महाराज 31 मे राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती, व सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा. याचे औचित्य साधून आज 10 जून रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .त्या भव्य रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. असल्याची माहिती *संभाजी ब्रिगेड चे परळी तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज* यांनी दिली.या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाची सुरुवात *राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर ,व छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेचे प्रथमता पूजन करण्यात आले व त्यानंतर *जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन *मराठा सेवा संघाचे तामिळनाडू पोंडीचेरी अंदमान निकोबार चे प्रभारी शिवश्री प्रा. एम. एल. देशमुख सर तर अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री ईश्वर जिल्हा सोनवणे तर प्रमुख उपस्थितीमध्ये जागृती मल्टीस्टेट चे चेअरमन शिवश्री प्रा. गंगाधर शेळके सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष शिवश्री राधाकिसन साबळे तसेच तसेच रक्तदान कॅम्प साठी आलेले डॉ. शशिकांत पारखे, डॉ. सुमित कांबळे, तसेच या भव्य रक्तदान शिबिरात आज 10 जून रोजी ब्रह्मवाडी ग्रामपंचायत सदस्य *शिवश्री लहू गीते* प्रहारचे तालुकाध्यक्ष *शिवश्री विष्णुपंत आरसूळे* सामाजिक कार्यकर्ते *दिनेश आमले यांचा मुलगा मयूर आमले* संभाजी ब्रिगेड तालुका सचिव *शिवश्री पुंडलिक लोणकर* यांचा वाढदिवस यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.

मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष *शिवश्री संदीप काळे व त्यांच्या पत्नी शिवमती अश्विनीताई काळे* या दाम्पत्याने सुद्धा आपल्या लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला .तसेच समाजकार्यात सतत सक्रिय असणारे रक्तदाते यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आज कोणासारखं महाभयंकर संकट जगावर ओढवले आहे त्याच अनुषंगाने रक्ताचा तुटवडा पाहता *संभाजी ब्रिगेडच्या* वतीने राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेड च्या वतीने आपल्या परळीत हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला तालुक्यातून व शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला राष्ट्रीय कर्तव्या साठी व आपल्या हातून समाजकार्य घडावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने केले होते त्या आव्हानाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये सर्व क्षेत्रातील व सर्व जाती व धर्माच्या रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला .या शिबिराचे आयोजन *सुज्वल मंगल कार्यालय जलालपूर रोड परळी-वैद्यनाथ* येथे करण्यात आले होते सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 पर्यंत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, नामदेव तुकाराम वारकरी परिषद*, यासह मराठा सेवा संघ प्रणित 33 कक्षातील पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *