महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुन । ज्ञानोबाच्या पालखीसाठी अलंकापूरी सजली आहे. चार वाजता पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली आहे.इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत.याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे.तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहोचेल.29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल.वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते.देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.