Ashadhi wari 2023 : पुण्यातील पालखी मार्गावरील ‘हे’ प्रमुख रस्ते बंद; पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारी (12 जून) शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थरेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.


वाहतुकीस बंद असणारे रस्ते (कंसात पर्यायी मार्ग)
गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलिस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स, शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता.
टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल, लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ‘नो एन्ट्री’
नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. या भागातील रस्ते सोमवारी (दि. 12 ) दुपारी 12 नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा बुधवारी (दि. 14 ) सकाळी शहरातून मार्गस्थ होणार आहे.

पोलिसांकडून लाईव्ह लोकेशन सुविधा उपलब्ध
पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील रस्ते बंद करण्यात येतात. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल, तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे.

पालखी मार्गावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर
पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असून, शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर ड्रोन कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *